मुंबई : बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सुपरहिट रिॲलिटी क्विज शो कौन बनेगा करोडपती सोबत वापसी केली आहे. दमदार प्रोमोनंतर प्रेक्षकांना या शोची खूप उत्सुकता होती. या प्रोमोमध्ये कर्नल सोफिया कुरैशी लष्कराच्या गणवेशात पूर्ण आत्मविश्वासाने मंचावर प्रवेश करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी अत्यंत आदराने त्यांचे स्वागत केले. आता स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी विशेष एपिसोड रिसीज केला जाईल. ज्यामध्ये देशाच्या वीरकन्या केबीसीच्या हॉट सीटवर असणार आहेत.
केबीसी १७ च्या स्वांतत्र्य दिन विशेष एपिसोडमध्ये भारतीय तीन महिला अधिकारी एकत्र असणार आहेत. कमांडर प्रेरणा देवस्थली (इंडियन नेवी), कर्नल सोफिया कुरैशी (इंडियन आर्मी), विंग कमांडर व्योमिका सिंह (इंडियन एअर फोर्स) या शोमध्ये सहभागी होणार आहेत.
रिपोर्टनुसार या तिन्ही अधिकारी ऑपरेशन सिंदूरशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी उलगडणार आहेत.
प्रोमोमध्ये कर्नल सोफिया कुरैशी म्हणतात – पाकिस्तान हे करत आला होता, त्यामुळे प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. त्यांनी या मोहिमेची संपूर्ण माहिती दिली आणि हेही सांगितलं की यात कोणत्याही सामान्य नागरिकाला इजा पोहोचलेली नव्हती.
तर विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणतात – मग रात्री १ वाजून ५ मिनिटांपासून १.३० वाजेपर्यंत अवघ्या २५ मिनिटांत खेळ संपवला. त्यानंतर कमांडर प्रेरणा देवस्थळी म्हणतात – टार्गेटला निशाणा साधून त्यांचा नायनाट केला, पण कोणत्याही नागरीकाला इजा पोहोचवली नाही. हा आहे नवा भारत, नव्या विचारांसह.मग रात्री १ वाजून ५ मिनिटांपासून १.३० वाजेपर्यंत अवघ्या २५ मिनिटांत खेळ संपवला.
या शोचे होस्ट अमिताभ बच्चन हे ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देतात. हा खास एपिसोड १५ ऑगस्ट, २०२५ रोजी रात्री ९ वाजता प्रसारित होईल.
स्वातंत्र्य दिनी हॉट सीटवर कर्नल सोफिया कुरैशी उलगडणार ‘ऑपरेशन सिंदूर’चे किस्से
