GRAMIN SEARCH BANNER

गांजासदृश अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर लांजा पोलिसांची कारवाई

Gramin Varta
184 Views

लांजा : शहरातील दोन तरुण गांजासदृश अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळल्याने लांजा पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.१३ वाजता धुंदरे येथील वांजुदेवी मंदिराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदादीप नामदेव वाघधरे (वय २९, रा. जुनी बाजारपेठ, हनुमान मंदिरासमोर, लांजा) आणि विनायक प्रकाश कुरुप (वय ३०, रा. कुरुपवाडी, लांजा) हे दोघे रस्त्याच्या कडेला बसून बेकायदेशीरपणे गांजासदृश पदार्थाचे सेवन करत होते. पोलिस पथकाला ही हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासणी केली असता दोघांकडून गांजासदृश अंमली पदार्थ सापडला.

याप्रकरणी दोघांवर एन.डी.पी.एस. कायदा १९८५ च्या कलम ८(क), २७ आणि २९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैंदाड या करत आहेत.

Total Visitor Counter

3370141
Share This Article