GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट, लोकांमध्ये घबराट!

Gramin Varta
548 Views

दिल्ली: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या कारमधील स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत.

विशेष म्हणजे कारमध्ये स्फोट झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या दोन कारला आग लागलेली आहे. या घटनेने दिल्लीमध्ये सध्या खळबळ उडाली असून लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

लोकांची मोठी गर्दी, परिस्थितीत घबराटीचे वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झालेला आहे. स्फोट झाल्यानंतर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. लोकांनी घटनास्थळी जात गर्दी केली. ही गाडी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभी होती. स्फोट झाल्यानंतर काही काळासाठी येथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हल्ला घडवून आण्यात आला का?

दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता शोधली जाणार आहेत.

सविस्तर बातमी लवकरच…

Total Visitor Counter

3367003
Share This Article