GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये ४५ वर्षीय तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

Gramin Varta
113 Views

खेड : तालुक्यातील बोरघर- ब्राह्मणवाडी येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मृत व्यक्तीची ओळख सुधीर लक्ष्मण पार्टे अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्टे हे काही काळ आर्थिक अडचणीत होते. अडीच लाखांचे कर्ज फेडता न आल्याने ते मानसिक तणावाखाली होते. अखेर या तणावाला कंटाळून त्यांनी आपल्या जुन्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3374442
Share This Article