GRAMIN SEARCH BANNER

गुहागर नगरपंचायत निवडणूक; भाजपचा उमेदवार बिनविरोध

Gramin Varta
241 Views

गुहागर : नगरपंचायतीमध्ये पहिला नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) उमेदवार वैशाली संतोष मावळंकर ह्या वार्ड क्रमांक पाच मधून बिनविरोध निवडून आल्या.

या वोर्डमध्ये फक्त दोनच उमेदवार अर्ज दाखल करीत होते. शिवसेना/मनसेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत सिद्धी राजेश शेटे यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तर भाजपकडून वैशाली मावळंकर उमेदवार म्हणून उभ्या होत्या.

निवडणूक सुरू होण्याच्या काही मिनिट आधीच सिद्धी शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, ज्यामुळे वैशाली मावळंकर बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आल्या. या बिनविरोध निवडीमुळे युतीत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भाजपकडील कार्यकर्ते आणि तालुका नेतृत्व यांचा म्हणण्यानुसार ही विजयाची नांदी असून, स्थानिक राजकीय युतीसाठी हा मोठा मिळकत ठरला आहे.

Total Visitor Counter

3367463
Share This Article