GRAMIN SEARCH BANNER

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

Gramin Varta
164 Views

सांगली : शहरातील कल्पतरू मंगलकार्यालय ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. एक मद्यधूंद कार चालक चुकीच्या दिशेने कार चालवत आला. त्याने समोरून येणाऱ्या चार ते पाच वाहनांना जोराची धडक दिली.

या अपघातात सहा ते सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मद्यधुंद चालकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांची तोडफोड केली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, रविवारी दि. २३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एक मद्यधुंद कार चालक त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडी हि भरधाव वेगात कॉलेज कॉर्नर ते कल्पतरू मंगलकार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरून घेऊन निघाला होता. यावेळी या चालकाने नशेत चुकीच्या दिशेने गाडी चालवून समोरून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला जोराची धडक दिली. यामध्ये काही कार आणि दुचाकींचे नुकसान झाले तर पाच ते सहा जण जखमी झाले.

गाडीचे एअर बॅग उघडल्याने मद्यधुंद चालक बचावला. अपघातानंतर परिसरातील नागरिक तसेच वाहनधारकांनी गाडीचा पाठलाग करून चालकाला पकडले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कारची मोठी तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, मद्यधुंद कार चालकाच्या हिट अँड रनच्या थरारामुळे अनेकांच्या अंगाचा थरकाप उडाला.

Total Visitor Counter

3380005
Share This Article