GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : प्रिंदावणेत 77, कुंभवडेत 63 जणांच्या तपासण्या

Gramin Varta
52 Views

रत्नागिरी:  टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत कुंभवडे पीएससी कार्यक्षेत्रात व्यापक तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

त्यात प्रिंदावण येथील ७७ जणांचे तर कुंभवडे प्राथमिक आरोग्यकेंद्रात ६३ एक्स-रे व संबंधित टीबी तपासण्या करण्यात आल्या आहेत.
अतिदुर्गम भागात घेण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेला जिल्हास्तरावरून तसेच स्थानिक स्तरावरून उत्तम प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात आरोग्य पर्यवेक्षक मंगेश पाटील, वैद्यकीय अधिकारी दिगंबर चौरे, कुंभवडे, डॉ. शिंदे, आरोग्य सहाय्यक लांघी, समुदाय आरोग्य अधिकारी वनवे, आरोग्य सहायिक मदने, आरोग्य सहाय्यक कांबळे यांच्यासह प्राथमिक केंद्रातील सर्व आरोग्यसेवक, सेविका, गटप्रवर्तक, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका यांचा सहभाग होता. या संपूर्ण मोहिमेसाठी जिल्हास्तरावरून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या सूचनेनुसार शिबिरात तपासणी झालेल्या सर्व रुग्णांची निक्षय पोर्टलवर १०० टक्के नोंदणी करण्यात येत असून, संबंधित सर्व तपासण्या तत्काळ भरण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे टीबीमुक्त भारत अभियानाला गावपातळीवर बळकटी मिळत असून, लवकर निदान-लवकर उपचार या धोरणालाही गती मिळत आहे. टीबीची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्यकेंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3368332
Share This Article