GRAMIN SEARCH BANNER

खेडमधील धामणदेवी ग्रा.पं. मधील वस्तू खरेदीमध्ये गैरव्यवहार?

Gramin Varta
33 Views

नागरिकाकडून पं.स.गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

खेड : तालुक्यातील धामणदेवी येथील नागरिक तथा ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी ग्रामविकास विभागाकडे सादर केलेल्या लेखी तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या खरेदी व विकासकामांतील गंभीर अनियमिततांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामपंचायत धामणदेवीसाठी करण्यात आलेल्या खरेदीत मोठ्या प्रमाणात नियमभंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीनुसार, पंचायत कार्यालयाने लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, कॅमेरे यांसह इतर वस्तू पोर्टलवरून खरेदी केल्या. मात्र त्या प्रक्रियेत अनेक गंभीर अनियमितता झाल्याचे पेवेंकर यांनी नमूद केले आहे.

या संदर्भातील इनव्हॉइसमध्ये नमूद नसलेल्या वस्तू प्रत्यक्ष खरेदी उदाहरणार्थ, कंपनीऐवजी इतर कंपन्यांचे लॅपटॉप व खरेदी केल्याचा आरोप. तसेच कंपनीच्या नावाने प्रिंटर दाखवत प्रत्यक्षात / उत्पादने खरेदी. खरेदी केलेल्या वस्तूंच्या गुणवत्ता व किंमत यात मोठा फरक, वस्तू अतिशय जास्त दराने विकत घेतल्याचा आरोप. वस्तू पुरवठा व तपासणी प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, विकासकामांमध्ये ४० पेक्षा अधिक कामे झाल्याचा दावा, परंतु पंचायतच्या नोंदीत केवळ १४ कामांची नोंद यामुळे आर्थिक अनियमिततेचा संशय असल्याचा उल्लेख. (अकस्मात खरेदी प्रमाणपत्र) देण्याचे निर्देश असतानाही ते न देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

उर्वरित कामांची मोजमाप नोंद पंचायत कार्यालयात उपलब्ध नाही, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार लपविण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तक्रारदार पेवेकर यांनी या सर्व बाबींची चौकशी करून संबंधित अधिकारी व व्यक्तींवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची विनंती गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच सर्व खरेदी, विकासकामांची नोंद, माहिती, इनव्हॉइस आणि इतर पुरावेही पत्रासोबत जोडले आहेत.

या तक्रारीमुळे धामणदेवी ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहार, खरेदी प्रक्रिया आणि विकासकामांवरील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि स्थानिक पातळीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी संबंधित विभागाकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3199545
Share This Article