GRAMIN SEARCH BANNER

खेड–दापोली मार्गावर बस–डंपरची धडक; वाहतूक कोंडी

Gramin Varta
59 Views

खेड : खेड–दापोली मार्गावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास वातानुकूलित इलेक्ट्रिक बसला डंपरची धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र धडकेमुळे बसचे नुकसान झाले. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताबाबत अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.

Total Visitor Counter

3370439
Share This Article