GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये बंद घर फोडून ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
79 Views

खेड : तालुक्यातील चांदघर–रेवीवाडी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ६ हजार रुपये रोकड असा एकूण ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २ ते ८ डिसेंबर दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी गणेश सखाराम सुर्वे (५०) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चोरट्याने घराच्या खिडकीची जाळी सरकवून घरात प्रवेश केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घरातील लोखंडी कपाटातील साड्यांच्या कप्प्यात ठेवलेली लॉकरी काढून त्यातील लॉकर उघडत दागिने व रोकड लांबवण्यात आली.

घरफोडीचा प्रकार उघडकीस येताच सुर्वे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3367463
Share This Article