GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी क्रांतीनगर येथे १ महिनाच्या चिमुकलीचा झोपेतच मृत्यू

रत्नागिरी : शहरातील क्रांतीनगर झोपडपट्टी परिसरात १ महिना १२ दिवसांच्या चिमुकलीचा झोपेतच आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी घडली. अफिफा हैदरअली सिरवार (वय १ महिना १२ दिवस, रा. क्रांतीनगर, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे या मृत मुलीचे नाव आहे. उपचारासाठी दाखल केल्यानंतर सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे तिला मयत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे सिरवार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरअली सिरवार यांच्या पत्नीची २४/१०/२०२५ रोजी सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे प्रसूती झाली होती. दि. ०५ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ०५.३० वाजता मुलगी अफिफा झोपेतून उठली असता, तिच्या आईने तिला दूध पाजून परत झोपवले. त्यानंतर सकाळी ०७.३० वाजता मुलीची आई झोपेतून उठून अफिफा हिला पाहिले असता, तिची कोणतीच हालचाल होत नव्हती आणि ती बेशुद्ध झाली होती. 

तातडीने चिमुकलीला उपचाराकरिता चौधरी हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला पाहून लगेच रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यास सांगितले. वडिलांनी मुलीला सिव्हील हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून सकाळी ०८.४५ वाजता तिला मयत घोषित केले.  वैद्यकीय अहवालानुसार, मुलीच्या मृत्यूचे कारण ‘सेरेब्रोपल्मोनरी एडेमा’ असे नमूद करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3434021
Share This Article