GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील कामगाराचा म्हापसा येथे सोलर पॅनेल साफ करताना मृत्यू; दोन घरमालकांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
139 Views
A shot in the morgue

रत्नागिरी: म्हापसा येथे घराच्या छतावरील सौरऊर्जा पॅनेल साफ करताना रत्नागिरी येथील एका कामगाराचा छतावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोन घरमालकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा येथील राजवाडो परिसरात राहणारे गॉडविन मेंडीस आणि मौना गौतम मुन्शी यांनी त्यांच्या घरावरील सोलर पॅनेल साफसफाईसाठी रत्नागिरी येथील रहिवासी महेश जनार्दन दळवी (वय ४७) यांना कामावर बोलावले होते. मात्र, उंचीवर काम करताना आवश्यक असणारी कोणतीही सुरक्षा साधने किंवा सुरक्षेची उपाययोजना संबंधित कामगाराला पुरविण्यात आली नव्हती.

२३ मे रोजी दुपारच्या सुमारास महेश दळवी हे छतावर काम करत असताना अचानक तोल जाऊन खाली पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर म्हापसा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अभिजीत मेघनाथ नाईक यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून दोन्ही घरमालकांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3433888
Share This Article