GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा नदीत पडून मृत्यू

Gramin Varta
303 Views

देवरुख : शहरातील सप्तलिंगी नदीपात्रात कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. कृष्णा शंकर गोसावी असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कृष्णा गोसावी यांनी मद्यप्राशन केले होते. ते देवरुख येथील सप्तलिंगी नदीवरील पुलावरून ये-जा करत असताना अचानक तोल गेल्याने थेट नदीपात्रात कोसळले. हा प्रकार मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ मदतीस धाव घेत गोसावी यांना नदीपात्रातून बाहेर काढले व उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती कृष्णा गोसावी यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitor Counter

3369876
Share This Article