GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: तुरळ येथे चार चाकीचा भीषण अपघात ; एक ठार

Gramin Varta
905 Views

मिलिंद चव्हाण/कडवई : संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे मुंबई गोवा महामार्गावर मराठवाडी फाटा येथे आज संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास वसईवरून गणपतीपुळे कडे जाणाऱ्या ब्रेझा कार चा रस्त्याच्या बाजूला लावलेला गार्ड ला धडकून भीषण अपघात झाला . यामध्ये चालक जागीच ठार झाला.

आज संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास वसई कडून गणपतीपुळे कडे जाणारी ब्रेझा कार क्रमांक एम एच ०४ जे व्ही ७१९८ कारच्या चालकाचा कर वरील ताबा सुटुन भीषण अपघात झाला . कार रस्त्याच्या बाजूला लावलेल्या लोखंडी गर्डर मध्ये घुसून तो गर्डर चालक सलिम सुलतान खान(,वय ४६) रा .वसई यांच्या  मांडीमध्ये घुसून चालक गाडीच्या बाहेर फेकला गेला व जागीच गतप्राण झाला.बाजूला बसलेला झोपेत असणारा त्याचा मित्र सुखविंदर संधू (वय ४६)  रा मिरारोड हा किरकोळ जखमी झाला

अपघाताची खबर मिळताच आरडीसी बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे , रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण त्यांचे सहकारी, माजी सभापती कृष्णा हरेकर , बाबू कुंभार हे घटना स्थळी पोहचले तात्काळ या घटनेची खबर पोलिसाना देण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी ऱ्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींला उपचारासाठी सांगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.व मृत चालकाचे शव शवविच्छेदनासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3376073
Share This Article