GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत आंबेडखुर्द येथील वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
222 Views

संगमेश्वर:कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची धडक बसल्याने संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द येथील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे.शांताराम तानु येल्ये (वय-६२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आंबेडखुर्द-भंडारवाडी येथील सुरंग बोगद्याजवळ घडली. शांताराम येल्ये हे रेल्वे रूळ ओलांडत असताना किंवा रुळाच्या कडेने जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची त्यांना जोराची धडक बसली असा अंदाज आहे या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी आंबेडखुर्दचे पोलीस पाटील सुरेश राहटे यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस स्थानकात खबर दिली. पोलीसांनी घटनेची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी आर. एस. गावीत करत आहेत.

Total Visitor Counter

3231426
Share This Article