चिपळूण: अपक्ष उमेदवार तेजस्वी किंजळकर यांचा उमेदवारी अर्ज मागे

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

शिवसेना-भाजप युतीचे सुयोग चव्हाण व शीतल रानडे यांना पाठींबा जाहीर

चिपळूण (प्रतिनिधी):- शहरातील प्रभाग क्रमांक १४ अ मधून भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या तेजस्वी संदेश किंजळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजप नेते प्रशांत यादव, सौ. स्वप्ना यादव यांच्या शब्दावर विश्वास ठेवून तेजस्वी किंजळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर शिवसेना भाजप- युतीचे या प्रभागातील उमेदवार सुयोग चव्हाण व शीतल रानडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे या दोन्ही उमेदवारांचा अडसर दूर झाला असून या दोघांनीही समाधान व्यक्त करत सौ. तेजस्वी किंजळकर यांना धन्यवाद दिले आहेत.

चिपळूण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली.  तर बुधवार दिनांक १९ पासून २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. यामुळे अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, यासाठी राजकीय पक्षांकडून या अपक्ष उमेदवारांशी चर्चा सुरू झाली आहे. 


भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली काही महिन्यांपूर्वी भाजपवासी झालेले पाग येथील संदेश किंजळकर, सौ. तेजस्वी किंजळकर यांना भाजपकडून उमेदवारी न दिल्याने  सौ. तेजस्वी किंजळकर यांनी प्रभाग क्रमांक १४ अ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर या प्रभागातून शिवसेना-भाजप युतीचे शिवसेनेचे सुयोग चव्हाण तर भाजपकडून सौ. शितल रानडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

5यामुळे अपक्ष उमेदवार सौ. तेजस्वी किंजळकर यांचा उमेदवारी अर्ज मागे जाणे महत्त्वाचे होते.  या दृष्टीने भाजप नेते प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी किंजळकर दाम्पत्याशी चर्चा केल्यानंतर सौ. तेजस्वी किंजळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेत या प्रभागातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुयोग चव्हाण व शितल रानडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबद्दल चव्हाण व रानडे या दोन उमेदवारांनी समाधान व्यक्त करीत किंजळकर दांपत्याचे आभार मानले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *