GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये ६९ वर्षीय वृद्धेचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
29 Views

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील जाबुर्डे-गवळवाडी येथे वास्तव्यास असलेल्या ६९ वर्षीय वृद्धेचा आकस्मिक मृत्यू झाला. गौरी प्रेमजी बोरा (मूळगाव कांदिवली, मुंबई) असे मृत वृद्धेचे नाव आहे.
घरात असताना त्या अचानक निपचित पडल्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने त्यांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3200654
Share This Article