GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी चांदेराई येथे शेकोटी घेताना महिलेच्या साडीने घेतला पेट, महिला गंभीर

Gramin Varta
241 Views

रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई गावात थंडीपासून बचावासाठी शेकोटीजवळ बसलेल्या एका महिलेच्या अंगावरील कपड्यांना अचानक आग लागल्याने ती गंभीररीत्या भाजली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. सेजल संतोष सुर्वे (वय ४२, रा. चांदेराई) असे जखमी महिलेचे नाव आहे.

सकाळच्या वेळी थंडी अधिक असल्याने सेजल सुर्वे या घराजवळ शेकोटीजवळ बसल्या होत्या. यावेळी अचानक त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. काही क्षणातच आग भडकली आणि त्या गंभीररीत्या भाजल्या. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली आणि त्यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.सध्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

3366680
Share This Article