GRAMIN SEARCH BANNER

दिक्षा खंडागळे यांच्याकडून देवरुख विकासाचे ‘गॅरंटी कार्ड’ आई सोळजाई चरणी अर्पण;देवीचा आशीर्वाद घेऊन  प्रचाराची सांगता

Gramin Varta
168 Views

निवडून आल्यास देवरुखचा सर्वांगीण विकास करणार; दिक्षा खंडागळेंचा आई सोळजाई देवीच्या साक्षीने निर्धार

देवरुख:देवरुख नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत गाव विकास समिती आणि आम आदमी पार्टी युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. दिक्षा रविंद्र खंडागळे यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या प्रचाराची सांगता अत्यंत श्रद्धापूर्वक वातावरणात केली. देवरुखचे ग्रामदैवत असलेल्या आई सोळजाईच्या चरणी ‘देवरुखच्या विकासाचे गॅरंटी कार्ड’ अर्पण करून दिक्षा खंडागळे यांनी देवीचा आशीर्वाद घेतला व प्रचाराचा समारोप केला.

गेले काही दिवस देवरुख शहरात जोरदार प्रचार सुरू होता. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी दिक्षा खंडागळे यांनी थेट ग्रामदैवत आई सोळजाईचे मंदिर गाठले. यावेळी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आणि विकासाच्या मुद्द्यांची नोंद असलेले ‘गॅरंटी कार्ड’ देवीच्या चरणी ठेवून त्यांनी आशीर्वाद घेतले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ. दिक्षा खंडागळे म्हणाल्या की, “देवरुखच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकून निवडून दिल्यास शहराचा कायापालट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. या गॅरंटी कार्डमध्ये ज्या योजनांचा उल्लेख केला आहे, त्या सर्व योजना आणि विकासकामे जनतेला सोबत घेऊन करेन .”

या प्रसंगी गाव विकास समितीचे देवरुख निवडणूक प्रभारी डॉ. मंगेश कांगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासाने यश नक्की मिळेल, असा विश्वास युतीतर्फे डॉ मंगेश कांगणे यांनी केला.

Total Visitor Counter

3388768
Share This Article