GRAMIN SEARCH BANNER

खेड बसस्थानकात पुन्हा चोरी, महिलेच्या पर्समधील 3.85 लाखांच्या दागिन्यांची चोरी

Gramin Varta
120 Views

खेड : खेड बसस्थानक परिसरात महिलांना लक्ष्य करून चोऱ्यांचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सहा दिवसांपूर्वी खेड–मंडणगड एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सव्वादोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने चोरीस गेल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एका महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारत तब्बल 3 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सहा दिवसांत घडलेल्या या दुसऱ्या घटनेमुळे खेड शहरात खळबळ उडाली असून महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

तक्रारदार महिला खेड बसस्थानकातून एसटी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने तिची बॅग उघडून आत ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोकड चोरून नेली. या चोरीत 2 लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, 1 लाख 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तसेच 5 हजार 200 रुपयांची रोकड असा ऐवज लंपास झाला आहे.
पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेला मोठा धक्का बसला. तिने तातडीने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार नोंदवली. त्यानुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3214632
Share This Article