मंडणगड : बाणकोट सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावित्री नदी पात्रात, उमरोली जेट्टी येथे २६ जुलै रोजी अंदाजे ३० ते ४० वयोगटातील एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, पोलादपूर, महाड, मंडणगड परिसरातून तो नदीपात्रात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली असून अद्याप मृत इसमाची ओळख पटलेली नाही.
मयत इसमाच्या उजव्या पायाच्या पोटरीवर “आई” असे मराठीत लिहिलेले आहे. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा व निळ्या बाह्यांचा टी-शर्ट, काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट व निळ्या रंगाची ESSA कंपनीची अंडरवेअर आहे. मृतदेह कुजल्यामुळे चेहरा ओळखण्यास अडचण येत आहे.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ बाणकोट सागरी पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंडणगडमध्ये सावित्री नदीत आढळला बेवारस मृतदेह
