GRAMIN SEARCH BANNER

खेड-खाडीपट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्री सात बंद घरांवर डल्ला

Gramin Varta
130 Views

खेड :  तालुक्यातील खाडीपट्ट्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. नांदगाव, कोरेगाव आणि सुसेरी या गावांमधील एकूण सात बंद घरांवर एका रात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सर्व ठिकाणी चोरट्यांना रिकाम्या हातानेच माघार घ्यावी लागली.

२४ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नांदगाव-दळवीवाडी येथील प्रशांत दळवी व आनंद दळवी यांच्या घरांसह रोहिदासवाडीतील दोन बंद घरांचे दरवाजे व कुलपे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच रात्री सुसेरी व कोरेगाव येथील काही बंद घरांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याची माहिती आहे. धारदार हत्यारांच्या साहाय्याने कुलपांच्या कड्या तोडून नुकसान करण्यात आले आहे.

या घटनेमुळे खाडीपट्ट्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून रात्रीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या सातही घटनांबाबत अद्याप कोणत्याही घरमालकाने पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्याचे समजते. सततच्या चोरीच्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली असून, पुढील अनर्थ टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

Total Visitor Counter

3366895
Share This Article