GRAMIN SEARCH BANNER

कुंभार्ली घाटात मालवाहू ट्रक उलटला; वाहतूक काहीकाळ ठप्प

Gramin Varta
180 Views

चिपळूण : चिपळूण–कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्याची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी घाटातील उतारावर एक मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक मुख्य रस्त्यावर आडवा पडल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून चढ-उताराच्या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. याच खड्ड्यांमुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. शुक्रवारी चिपळूणच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरील खड्ड्यात अडकल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक उलटला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने ट्रक हटवला आणि काही वेळानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Total Visitor Counter

3377091
Share This Article