GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : करंबेळे येथे रिक्षा १० फूट खोल पऱ्यात कोसळली; दोन महिला जखमी

Gramin Varta
741 Views

देवरुख: देवरुख-संगमेश्वर राज्य मार्गावर करंबेळे येथे एक भीषण अपघात घडला असून मोरीवरून रिक्षा कोसळून दोन महिला जखमी झाल्या आहेत. करंबेळे येथील सीमेनजीक असलेल्या मोरीवरून गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रिक्षा थेट १० फूट खोल पाण्यात कोसळली. या अपघातात सई लिंगायत (वय ३०) आणि रेश्मा लिंगायत (वय ५५, दोन्ही राहणार शिवने, तालुका संगमेश्वर) या दोन महिला जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई लिंगायत हे आपली रिक्षा (क्रमांक एम.एच. ०८, ए क्यू ७९७७) घेऊन आई आणि पत्नीसह शिवने येथून देवरुखच्या दिशेने जात होते. करंबेळे परिसरात आल्यावर चालकाचा रिक्ष्यावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात रिक्ष्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींना सुरुवातीला देवरुख ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3388097
Share This Article