GRAMIN SEARCH BANNER

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मंडणगडात सहा मद्यपींवर कारवाई

Gramin Varta
38 Views

मंडणगड : नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मंडणगड तालुक्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून वावरत असलेल्या सहा जणांवर ३१ डिसेंबर रोजी पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.

मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजारपेठ व परिसरात गस्तीदरम्यान हे सहा जण मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यामध्ये रामाप्पा कक्कासगेरा (३१, मूळ कर्नाटक, सध्या मंडणगड), पवनकुमार म्हातो (२२), प्रेमकुमार दास्तई माझी (२५), चेतन खैरे (२४, तिघेही कुंबळे), तसेच सुधीर मडावी (३१) आणि मेघश्याम मशाखेतरी (३५, दोघेही मूळ गडचिरोली, सध्या धुत्रोली) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी दिवसभर व रात्रीच्या वेळेत वेगवेगळ्या ठिकाणी हे आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. त्यांच्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

नववर्षाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Total Visitor Counter

3388768
Share This Article