GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी बंदर रोड येथे काकाच्या जमिनीवर पुतण्याचे अतिक्रमण, काकाला दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
268 Views

रत्नागिरी : शहरातील बंदर रोडवरील भागेश्वर मंदिराच्या मागील परिसरात काकाच्या मालकीच्या जमिनीवर पुतण्याने अनधिकृतपणे प्रवेश करून अतिक्रमण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जमीनमालकाला दमदाटी केल्याचा आरोप करत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात अभिजीत प्रदीप कीर (वय ३८) याच्यावर आरोप ठेवण्यात आला असून अंकुर अनंत कीर (वय ७३) यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २६ मार्च २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत बंदर रोड, भागेश्वर मंदिरामागील परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, अंकुर कीर यांच्या मालकीच्या फ्लॅट क्रमांक २७/१-ब या जागेत त्यांचा पुतण्या अभिजीत कीर याने कोणतीही परवानगी न घेता प्रवेश केला. जमिनीचा ताबा मिळवण्याच्या उद्देशाने आरोपीने त्या जागेवर चिऱ्याच्या भिंती उभारून कंपाऊंड बांधत अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. याशिवाय, जमीनमालकाला दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.०४ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अभिजीत कीर याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ३२९(३) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3369440
Share This Article