GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन वासरांचा मृत्यू; ग्रामस्थ भयभीत

Gramin Varta
132 Views

खेड : तालुक्यातील आंजणी–गवळवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्याने हल्ला करून तीन वासरांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्याच्या मालकीची ही वासरे असून, बिबट्याच्या हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

दिवसा देखील बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. शेतकरी, पशुपालक तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3369673
Share This Article