GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये प्रेमसंबंधाच्या गैरसमजावरून महिलेचा खून ; सहा महिलांची निर्दोष मुक्तता

Gramin Varta
256 Views

खेड : प्रेमसंबंधाच्या गैरसमजातून रेखा लक्ष्मण मुकना (रा. दहिंबे, ता. मंडणगड) यांच्या घरात घुसून खून केल्याच्या आरोपाखाली अडकलेल्या सहा महिलांची जिल्हा न्यायाधीश–१ यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. हा प्रकार २२ मे २०१८ रोजी दापोली व मंडणगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.

या प्रकरणात संगीता शांताराम जाधव, शोभा सुरेश मुकना, चांद्री सहदेव मुकना, योगिता योगेश जाधव, वत्सला शंकर जाधव आणि भागी प्रकाश मुकना (सर्व रा. दहिंबे आदिवासीवाडी, ता. मंडणगड) यांच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता.

फिर्यादी निशा नितीन मोरे या मयत रेखा मुकना यांच्या आई असून, रेखा यांचे संगीता जाधव यांचे पती शांताराम जाधव यांच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमजातून लाठी-काठी व दगडांनी मारहाण करून खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. अश्विन भोसले यांनी साक्षीदारांच्या उलट तपासणीत अनेक विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व सहा आरोपी महिलांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात अ‍ॅड. सिद्धी खेडेकर, अ‍ॅड. प्रिती भेकरे आणि अ‍ॅड. अंकिता भेकरे यांनीही बचाव पक्षास सहकार्य केले.

Total Visitor Counter

3199272
Share This Article