GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

Gramin Varta
519 Views

९ पैकी ५ पाच पंचायत समितीवर महिलाराज

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापदी पदासाठी आज आरक्षण जाहिर झाले आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ पंचायत समिती पैकी ३ पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण, ४ पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण स्त्रियांसाठी तर १ पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर १ नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षित झाला.

त्यामध्ये पंचायत समिती सभापतीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण -मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड

सभापती पदासाठी सर्वसाधारण (ओपन) गटासाठी आरक्षण-रत्नागिरी, चिपळूण, गुहागर पंचायत समिती

नागरिकांचा मागास प्रवर्ग– दापोली पंचायत समिती सभापती

नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री साठी आरक्षण- राजापूर पंचायत समिती सभापती असे आरक्षण काढण्यात आले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत निघाली. अनन्या अक्षय उकिरडे या चिमुकलीने सोडतीच्या चिठ्या काढल्या.

Total Visitor Counter

3367000
Share This Article