GRAMIN SEARCH BANNER

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये चार वर्षीय चिमुकलीवर चालकाचा अत्याचार!

Gramin Varta
279 Views

बदलापूर : शहरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार केल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आली आहे.

या घटनेने एकच खळबळ उडाली आणि लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. तर या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर याआधीही बदलापुरात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती.

या घटनेनंतर बदलापूरवासियांनी प्रचंड आक्रमक होत अक्षरशा रेल रोको आंदोलन केलं होतं. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक करून त्याचे एन्काउंटर केले होते. शिवाय, या संपूर्ण घटनेवरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं होतं.

प्राप्त माहितीनुसार, शाळेच्या मिनी बसमध्येच चालकाने चिमुकलीवर अत्याचार केला. यानंतर या घटनेची माहिती चिमुकलीने घरी पालकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास देखील सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3377039
Share This Article