GRAMIN SEARCH BANNER

पाली शाळा क्र.१ ची अवंतिका हट्टीहोली थाळीफेकमध्ये जिल्ह्यात द्वितीय

Gramin Varta
306 Views

पाली : यंदाच्या शैक्षणिक वर्षातील रत्नागिरी जिल्हास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जि. प. पूर्ण प्राथमिक आदर्श विद्यामंदिर, पाली शाळा क्र.१ येथील अष्टपैलू खेळाडू अवंतिका यल्लाप्पा हट्टीहोली हिने मोठा गट मुलींच्या थाळीफेक स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाची भर घातली आहे.

विशेष म्हणजे, गतवर्षीही अवंतिकाने लहान गटातील थाळीफेक स्पर्धेत जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून आपली सातत्यपूर्ण गुणवत्ता सिद्ध केली होती. तिच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक मारुती घोरपडे, मुख्याध्यापक जनार्दन मोहिते तसेच उपशिक्षक ममता सावंत, श्रद्धा रसाळ, नेहा जाधव आणि श्रुती वारंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

अवंतिकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे आणि विद्यार्थी सुरक्षा समितीचे अ‍ॅड. सागर पाखरे यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3375070
Share This Article