GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत ५ एप्रिल रोजी भंडारी वधू-वर सूचक मेळावा

Gramin Varta
184 Views

रत्नागिरी: रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे येत्या ५ एप्रिल २०२६ रोजी वधू-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ वेळोवेळी वधू-वर मेळावे घेऊन इच्छुकांचे विवाह जुळविण्याचे कार्य करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून ५ एप्रिल रोजी भंडारी ज्ञातीतील बांधवांसाठी वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. भैरव मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हा मेळावा होणार आहे.

इच्छुक नोंदणीकृत/नवीन नोंदणी वधू-वर व घटस्फोटित वधू-वर यांनी व्यक्तिशः व पालकांसहित मेळाव्यासाठी उपस्थित राहावे. प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे. येताना सोबत जन्मपत्रिका झेरॉक्स, फोटो आणि स्वतःचा बायोडाटा आणावा असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या उपाध्यक्षा आणि मेळावा प्रमुख ॲड. प्रज्ञा तिवरेकर यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3391843
Share This Article