GRAMIN SEARCH BANNER

माणिकराव कोकाटेंचं ‘अटक वॉरंट’ घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल

Gramin Varta
121 Views

मुंबई: सदनिका गैरव्यहार प्रकरणी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी नाशिक पोलिस रात्री उशीरा मुंबईतील लीलावती रूग्णलायत दाखल झाले.होते. या ठिकाणी कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

सदनिका गैरव्यहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. नाशिक पोलिस मुंबईत दाखल झाल्यानंतर वांद्रे पोलिसांशी चर्चा करून आणि उपचार करत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोकाटेंच्या अटकेची कारवाई पूर्ण करत आहेत.


याआधी संध्याकाळी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला होता. त्यानंतर नाशिक पोलिस कोकाटेंच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अटक वॉरंट घेऊन नाशिकवरून मुंबईत कोकाटे उपचार घेत असलेल्या लीलावती रूग्णालयाकडे रवाना झाले होते.

कोकाटे यांच्याकडील मंत्रिपदाचा कार्यभार बुधवारी रात्रीच काढून घेण्यात आला होताआणि त्यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यामुळे काही तास कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री होते. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी केलेल्या मागणी नंतर कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. त्यांच्याकडे सध्या क्रीडा खाते होते.

कोकाटे यांनी शासकीय सदनिका मिळवण्यासाठी अल्प उत्पन्नाचे खोटे कागदपत्रे सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते.

Total Visitor Counter

3368900
Share This Article