GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर राजीवली शिर्केवाडी येथील वृद्ध बेपत्ता

Gramin Varta
99 Views

संगमेश्वर : तालुक्यातील राजीवली शिर्केवाडी येथील ९५ वर्षीय वृद्ध शाहु तुकाराम शिर्के हे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता नोंद करण्यात आली आहे.

शाहु शिर्के हे दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २.५० वाजता ठाणे येथून आपल्या मूळ गावी राजीवली (ता. संगमेश्वर) येथे येण्यासाठी निघाले होते. ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास ते आरवली (ता. संगमेश्वर) येथे आल्याची माहिती मिळाली. मात्र त्यानंतर ते अद्याप घरी पोहोचले नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

नापत्ता झालेल्या वृद्धांचे पुत्र तुकाराम शाहु शिर्के यांनी नातेवाईक, गाव परिसर तसेच आजूबाजूच्या भागात सर्वत्र शोध घेतला. मात्र शाहु शिर्के यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. अखेर १३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३४ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता बाबत तक्रार दाखल करण्यात आली.

शाहु शिर्के यांची उंची सुमारे ६ फूट असून बांधा सडपातळ, वर्ण निमगोरा, केस काळे-पांढरे आहेत. त्यांना फ्रेंच कट मिशी असून डाव्या डोळ्याने दिसत नाही. नापत्ता होताना त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट, खाकी रंगाची फुल पँट आणि पायात काळ्या रंगाची प्लास्टिक चप्पल होती. त्यांच्या जवळ मोबाईल फोन किंवा अन्य मौल्यवान वस्तू नव्हत्या. त्यांची बोलीभाषा मराठी असून दारू, चहा व पान-सुपारी खाण्याची सवय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Total Visitor Counter

3377248
Share This Article