GRAMIN SEARCH BANNER

पाचल येथे भात, नाचणी पिकांच्या नुकसानीचा पंचनामा सुरू

Gramin Varta
391 Views

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्याचे तहसीलदार श्री. विकास गंबरे यांच्या आदेशानुसार महसूल गावनिहाय भात आणि नाचणी पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार आज दि. २ नोव्हेंबर रोजी पाचल गावात पंचनामा सुरू करण्यात आला.

सकाळी ८ वाजल्यापासून तलाठी श्री. नेरके, त्यांचे कर्मचारी तसेच पाचल गावचे पोलीस पाटील महेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत पंचनामा कार्यवाहीला प्रारंभ झाला. दुपारपर्यंत पेठवाडी आणि गुरववाडी येथे पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. संध्याकाळपर्यंत करावली, पाटकरवाडी आणि इतर भागातील शेतकऱ्यांच्या शेतांमध्येही पंचनामा होणार असल्याची माहिती पोलीस पाटील महेंद्र जाधव यांनी दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, अजूनही काही शेतकऱ्यांचे नुकसान बाकी असल्यास त्यांनी तातडीने पाचल तलाठी कार्यालयात संपर्क साधून आपली माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3379830
Share This Article