देवरुख भाजपतर्फे प्रशांत यादव यांचे जोरदार स्वागत
देवरुख : मी एकदा मैदानात उतरलो की कोणतीच हयगय करत नाही.मी काय करू शकतो हे मी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे.आता तुमच्या सारखी कार्यकर्त्यांची भक्कम फळी मला मिळाली आहे.त्यामुळे पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा मैदानात उतरलो असून आता शतप्रतिशत भाजप हे मिशन घेऊन पुढे जायचे आहे.तुम्ही सर्वांनी साथ द्या,संगमेश्वर तालुक्यात देखील भाजपला प्रथम क्रमांकावर आणण्याची जबाबदारी मी घेतो.आशा खणखणीत शब्दात भाजप नेते प्रशांत यादव यांनी देवरुख येथील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास दिला.देवरुख येथील भाजप कार्यालयात झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टीमध्ये नुकतेच प्रवेश केलेले प्रसिद्ध उद्योजक प्रशांत यादव मंगळवारी देवरुखमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या उपस्थितीत संगमेश्वर तालुका भाजपकडून प्रशांत यादव यांचे प्रचंड गर्दीत जोरदार स्वागत करण्यात आले.
भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी एक वेगळाच उत्साह दिसून येत होता.देवरुख येथील भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी प्रशांत यादव यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्याबरोबरच विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद आधटराव,तालुकाध्यक्ष रुपेश कदम,विनोद म्हस्के,शहराध्यक्ष सुशांत मुळे, माजी नगराध्यक्ष निलेश भुरवणे,माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये,माजी जी.प.सदस्य मुकुंद काका जोशी,जिल्हा सरचिटणीस राकेश जाधव,साडवलीचे माजी उपसरपंच अभिजित सप्रे, माजी उपनगराध्यक्ष वैभव कदम,दत्ता नार्वेकर,सचिन बंडागळे, संदीप वेळवणकर,मंदार खंडकर यांच्यासह प्रशांत यादव यांच्या सोबत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय देसाई,माजी जी.प.सदस्या दीप्ती महाडिक,दत्ताराम लिंगायत, अन्वर जबले, चिपळूण तालुका सरपंच संघटना अध्यक्ष योगेश शिर्के,माजी प.स.सदस्य रघुनाथ ठसाळे, माजी प.स.सदस्य प्रकाश कणसे,अनिलशेठ चिले, अनिलशेठ चव्हाण,बावाशेठ महाडिक,कोसूंबचे माजी सरपंच रविशेठ पवार,नंदकुमार जाधव,समीर खामकर,शमूनभाई घारे, प्रीतम बंडागळे, मालघरचे माजी सरपंच सुनील वाजे, भाऊ मोहिते,राहुल पवार,महेश महाडिक भाजप तालुका सचिव मंदार कदम,तेंजस शिंदे,मन्सूर खड्पोलकर,अक्षय शिंदे,शशांक धामणे, करंबेळे गुरुजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रशांत यादव म्हणाले पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही.गणेशोत्सवा नंतर येथील प्रत्येक पंचायत समिती गणात गावभेट दौरा करणार आहे,त्यावेळी पक्षात इन्कमिंग ओघ सुरू होईल तो मग थांबणार नाही.अतिशय मजबूत असे संघटन या तालुक्यात उभे करू,तुम्ही सर्वांनी एक दिलाने मला साथ द्या,येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.त्यासाठी तयारी करायची आहे.पक्षात नवेजुने असा विषय असणार नाही.येथे मेरिटप्रमाणेच पद आणि उमेदवारी दिली जाते,त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन निर्णय होईल.त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा,असा संदेश त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
आम्ही तयार आहोत : राजेश सावंत
भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यावेळी म्हणाले प्रशांत यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.त्यांनी आता चिपळूण संगमेश्वर मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात फिरावे,वाशिष्ठी डेअरीचा विस्तार आता रत्नागिरी,राजापूरपर्यंत करावा, सहकार क्षेत्रात त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे.सहकाराचे हे जाळे संपूर्ण जिल्ह्यात विस्तारित झाले पाहिजे,पक्ष त्यांना कोणतीही उमेदवारी देऊ दे आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठी उभे राहणार आहोत.भाजपमध्ये नवा जुना असा विषयच नसतो,येथे प्रत्येकाचा सन्मान केला जातो.त्यामुळे प्रशांत यादव यांच्या बरोबर ज्यांनी-ज्यांनी प्रवेश केला आहे त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी प्रमोद आधटराव,दत्ताराम लिंगायत, रुपेश कदम, विनोद म्हस्के यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.