कडवई (मुजीब खान) : लांजा तालुक्यातील उदयोन्मुख सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. अरबाज हाजीमिया नेवरकर यांची ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड–२०२५’ या राष्ट्रीय गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ‘आधार सोशल फाऊंडेशन’ (कर्नाटक महाराष्ट्र-गोवा) यांच्या वतीने हा सन्मान प्रदान केला जाणार असून, ५ ऑक्टोबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भव्य समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलेल्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी व्यक्ती म्हणून या पुरस्काराने गौरवण्यात येते. आदर्श समाजरत्न या विशेष सन्मानासाठी अरबाज नेवरकर यांची निवड झाली असून त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.
रविवार, दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १ वाजता,
रिजनन्स प्लेस, रायसन्स हॉटेल, ताराबाई पार्क, पंचशील हॉटेलजवळ, कोल्हापूर या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. विक्रम संभाजी शिंगाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. “देश घडवणाऱ्या आदर्श व्यक्तींना सन्मानित करणे हीच खरी प्रेरणा असून, अरबाज नेवरकर यांचे कार्य समाजासाठी अनुकरणीय आहे, असे संस्थेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सन्मानपत्र, मानचिन्ह, मेडल आणि शाल देऊन अरबाज नेवरकर यांना गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे लांजा तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे.
लांजा : अरबाज हाजीमिया नेवरकर यांना ‘नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड–२०२५’ जाहीर
