GRAMIN SEARCH BANNER

अपडेट : भाट्ये येथील अपघातात 2 तरुणी, 2 तरुण जखमी: जखमींमध्ये फणसोप, रनपार येथील दोघांचा समावेश

रत्नागिरी: शहरानजीक भाट्ये चेकपोस्ट येथे दोन दुचाकींमध्ये आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन कॉलेजवयीन तरुणी आणि दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली. राजेश कीर (बुलेटस्वार, 41, रनपार, रत्नागिरी ), मिलिंद महाडिक (47, फणसोप, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर मानसी पवार (19, भाट्ये, खोतवाडी), रुद्राक्षा पवार (17, भाट्ये रत्नागिरी) असे किरकोळ जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरीहून पावसच्या दिशेने बुलेट स्वार राजेश कीर आपला मित्र मिलिंद सोबत जात होता. यावेळी भाट्ये हून रत्नागिरीच्या दिशेने दोन तरुणी ऍक्टिव्ह वरून कॉलेजला जात होत्या. दरम्यान चेकपोस्टवर भरधाव बुलेटस्वार राजेश कीर याने मानसी पवार हिच्या ऍक्टिव्हल जोरदार धडक दिली. यामध्ये अँक्टिव्हा वरील मानसी पवार आणि रुद्राक्षा पवार किरकोळ जखमी झाल्या तर राजेश आणि मिलिंद जखमी झाले. त्यांना सिव्हिल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Total Visitor Counter

2455607
Share This Article