लांजा : विद्यादीप इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि देवांग नर्सिंग स्कूल लांजा या ठिकाणी गुरुवारी १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये रिया पिलके, श्रुतिका घाग, शुभम नाडनकर, शुभम पाष्टे यांनी मनोगत व्यक्त केली. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिक्षक वृंद यामध्ये कॉलेजचे प्राचार्य अमोल जाधव, प्राध्यापिका श्रुती गुंडये, श्रुतिका पाताडे, कुदसिया लांबे, कोमल कोतवडेकर, नेत्रा लांजेकर, मधुरा पाटील, संतोष खेतल यांनीही मनोगत व्यक्त केली.
दरम्यान, कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या ओंमले, आभार तनिष्का चव्हाण तर प्रास्ताविक श्रावणी मांडवे या विद्यार्थीनींने केले.
विद्यादीप स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
