GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत आंबोळगडच्या विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळाचा ‘गुरुगौरव पुरस्काराने सन्मान’

राजन लाड (जैतापूर)

पारंपरिक भजन-कीर्तन परंपरेत आपली स्वतंत्र छाप उमटवणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंबोळगड गावचे रहिवासी आणि विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळ यांचा राज्याचे उद्योग मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. उदय सामंत यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

‘आभार संस्था भजन कला मंच, रत्नागिरी जिल्हा’ यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात उत्कृष्ट जेष्ठ भजनी बुवा श्री विश्वास गणपत करगुटकर, भजन परंपरेचा वारसा जपत आजच्या पिढीत लोकप्रिय ठरलेले श्री प्रीतम करगुटकर, पकवाज वादनाने भजनाला लयबद्धतेची उंची देणारे श्री श्रीपाद करगुटकर, तसेच भजन सेवेतील योगदानाबद्दल श्री हरिविजय वाडेकर व श्री यशवंत करगुटकर यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र प्रदान करून गुरुगौरव पुरस्कार देण्यात आला.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी भजन परंपरेची अखंड परंपरा जपणाऱ्या आंबोळगडच्या मंडळाचे मनःपूर्वक कौतुक केले. “भजन ही केवळ कला नसून ती अध्यात्मिक साधना आहे. अशा मंडळामुळे समाजात नैतिक मूल्यांचा वारसा टिकून राहतो,” असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले.

आंबोळगड गावातील विठ्ठल-रखुमाई प्रासादिक भजन मंडळाला मिळालेला हा सन्मान हा संपूर्ण राजापूर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Total Visitor Counter

2474934
Share This Article