डोंबिवली: येथील स्वामी गगनगिरी महाराज संत्सग केंद्र यांच्यावतीने नुकताच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. शशिकांत लाड यांच्या पत्नी सौ.सरिता शशिकांत लाड यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
याप्रसंगी सत्संग केंद्राचे सेक्रेटरी श्री.राजेंद्र तेरसे,खजिनदार मधुकर नारकर व अनेक भाविक भक्तमंडळी बहुसंख्यने उपस्थित होती.
संत्सग केंद्र हे दीप अनुग्रह सोसायटी,पवार चौक, फडके क्राॅस रोड डोंबिवली-पूर्व येथे असून याठिकाणी दर शनिवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत नामस्मरण व आरती होत असते.तरी गगनगिरी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा व सहकार्य करावे,असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी श्री.राजू तेरसे यांनी केले आहे.