GRAMIN SEARCH BANNER

देवरुखमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ल्यात दोघे जखमी

Gramin Varta
132 Views

देवरुख : शहरातील माणिक चौक व बसस्थानक परिसरात भटक्या श्वानांनी मंगळवारी दोन तरुणांवर हल्ला करून त्यांना चावा घेतला. जखमी झालेल्या अक्षय सावंत (रा. लांजा) आणि योगेश पडवळ यांनी देवरुख ग्रामीण रुग्णालयात तत्काळ उपचार घेतले.
देवरुख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शालेय विद्यार्थी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, नगरपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3373626
Share This Article