GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : खेडशी येथे कार-दुचाकीची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

Gramin Varta
460 Views

खेडशी : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील खेडशी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी 5 वाजता कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास महालक्ष्मी मंदिराजवळील धोकादायक वळणावरून येणाऱ्या कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकीचा चक्काचूर झाला असून त्यावरील दोघे प्रवासी रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करण्यास सुरुवात केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात हलवले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitor Counter

3391420
Share This Article