GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: ओणी कासारवाडी येथे पूर्ववैमनस्यातून भाच्याकडून मावशीवर लोखंडी पहारने प्राणघातक हल्ला

Gramin Varta
221 Views

राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात, ओणी कासारवाडी येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीने केलेल्या जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका भाच्याने आपल्या मावशीवरच लोखंडी पारेने हल्ला केल्याची गंभीर घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मावशी गंभीर जखमी झाली असून आरोपी भाच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओणी कासारवाडी येथे राहणाऱ्या ४० वर्षीय प्रमिला पांडुरंग बावकर यांनी या घटनेसंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी प्रमिला बावकर यांचे पती आणि आरोपी सुनिल लक्ष्मण माळी यांच्यात काही जुने वाद होते. आरोपी सुनिल माळी हा फिर्यादी प्रमिला बावकर यांचा भाचा असून, त्याने याच पूर्वीच्या वैमनस्यातून मावशीला धडा शिकवण्याचा कट रचला.
४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी सुनिल माळी हा फिर्यादी प्रमिला बावकर यांच्या राहत्या घरी गेला. त्यावेळी त्याने थेट फिर्यादींच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. आरोपीने आपल्या हातातील लोखंडी पाऱ्याने प्रमिला बावकर यांच्या डोक्यावर मारहाण केली. या अनपेक्षित आणि प्राणघातक हल्ल्यात प्रमिला बावकर यांना गंभीर दुखापत झाली आणि त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या.

घटनेनंतर जखमी प्रमिला बावकर यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा हल्ला पूर्वनियोजित वैमनस्यातून झाला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी प्रमिला पांडुरंग बावकर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार, राजापूर पोलिसांनी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे २ वाजून ०६ मिनिटांनी आरोपी सुनिल लक्ष्मण माळी याच्याविरुद्ध गु.आर.नं. २०३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८ (१) (दुखापत करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. कौटुंबिक संबंधातील या गंभीर गुन्ह्यामुळे ओणी कासारवाडी गावात एकच चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3073091
Share This Article