GRAMIN SEARCH BANNER

नशामुक्त भारत भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत तरुणांनो सहभाग नोंदवा – प्रथमेश धामणस्कर

Gramin Varta
115 Views

संगमेश्वर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे . या अभियानानिमित्त व तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘नमो युवा रन मॅरेथॉन ‘स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या वतीने चिपळूण येथे २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६:३० वा.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व युवक युवती यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन युवा मोर्चा संगमेश्वर दक्षिण चे तालुकाध्यक्ष प्रथमेश धामणस्कर यांनी आवाहन केले आहे

Total Visitor Counter

3387168
Share This Article