GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : वाशी फाटा येथील अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
201 Views

संगमेश्वर : तालुक्यातील वाशी तर्फे देवरुख बौद्धवाडी येथील सुधाकर सयाजी कांबळे या तरुणाचा अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान रत्नागिरी येथे शुक्रवारी निधन झाले.

देवाख–रत्नागिरी मार्गावरील वाशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुधाकर कांबळे रस्त्याच्या कडेला उभा असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तत्काळ देवाख ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता सुधाकर कांबळे यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचा मृतदेह वाशी येथे आणण्यात आला असून शोकाकूल वातावरणात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Total Visitor Counter

3073054
Share This Article