GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जेएसडब्ल्यू लेबर कॉलनीत कामगाराची आत्महत्या

Gramin Varta
214 Views

रत्नागिरी : तालुक्यातील जेएसडब्ल्यू लेबर कॉलनीतील एका खोलीत प्रौढ कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद–खंडाळा येथे दाखल करण्यात आले होते; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झबन तालो मांझी (वय ४६, मूळ रा. डकै, देवघर, राज्य झारखंड; सध्या रा. जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, जयगड, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १६ जानेवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार झबन मांझी हे लेबर कॉलनीतील खोलीत झोपले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन कामगारही त्या खोलीत झोपले होते. खबर देणारा गुज्जर मांझी हा पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी कॅन्टीनमध्ये गेला होता. त्यानंतर पहाटे सुमारे ५ वाजता झबन मांझी यांनी खोलीतील लोखंडी बारला दोरी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

त्यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद–खंडाळा येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3367002
Share This Article