GRAMIN SEARCH BANNER

न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथील विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी देशभक्तीपर पथनाट्य

Gramin Varta
13 Views

लांजा : ‘हर घर तिरंगा’ या केंद्र शासनाच्या देशभक्तीपर अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथील विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी देशभक्तीपर पथनाट्य सादर केले.

या पथनाट्यातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे, देशासाठी योगदानाची जाणीव निर्माण करणे व सामाजिक जबाबदारीची ओळख करून देणे, हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता. सादरीकरणात स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, मतदानाचे महत्त्व, सायबर गुन्हे, भ्रष्टाचार, राष्ट्रसेवा आणि तरुणांची भूमिका अशा विषयांचा प्रभावी समावेश करण्यात आला.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी केलेल्या जोशपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांमध्ये देशप्रेमाचे भाव उमटले होते. अभिनय, संवाद व सादरीकरणातील तीव्रता यामुळे पथनाट्य लक्षवेधी ठरले. यावेळी प्रशालेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापक वसंत आजगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत सांगितले की, देशभक्ती कृतीतून व्यक्त झाली पाहिजे आणि ती अशा उपक्रमातूनच घडते.

Total Visitor Counter

2649946
Share This Article