GRAMIN SEARCH BANNER

आंबेडकरी जलसा कलाकारांची महत्त्वपूर्ण सभा २७ रोजी जाकादेवीत

जाकादेवी/ संतोष पवार : आंबेडकरी चळवळीतील  जलसाकार मंडळांतील कलाकार ,कवी ,गायक, वादक अभिनयकार यांना नव्याने स्फूर्ती-प्रेरणा- नवचेतना देण्याच्या दृष्टीने तसेच आंबेडकरी  जलसा कलाकारांची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील कलाकारांची महत्वपूर्ण सभा जाकादेवी हायस्कूल येथे बुधवार दिनांक २७  ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

आंबेडकरी जलसा यांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम त्यावेळी अनेक जलसाकार मंडळांनी केले.अलिकडे जलसा मंडळ खूप मोजकीच दिसून येत आहेत.  समाज प्रबोधनाच्या दृष्टीने जलसाकार मंडळींना एकत्रित करून कलाकारांना नव्याने नवसंजीवनी देण्यासाठी धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी या कला मंचातर्फे २७ ऑगस्ट रोजी सकाळी१०  वाजता जाकादेवी येथील माध्यमिक विद्यालयात एक महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले आहे .

या सभेसाठी मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध कवी,लेखक, दिग्दर्शक साहित्यिक व जलसाकार म्हणून नावलौकिक संपादन केलेले लोवळे गावचे सुपुत्र मनोज जाधव सर  यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कलाकारांच्या माध्यमातून आणि गायनातून धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आंबेडकरी चळवळ विचारधारेचे  निष्ठावान कार्यकर्ते,प्रसिद्ध गायक ,कवी रविकांत पवार सर यांच्या व काही निष्ठावान मंडळींच्या माध्यमातून ही चळवळ अधिक वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रत्नागिरी तालुक्यातील जलसाप्रेमी मंडळं, कलाकार,जुने जाणते कार्यकर्ते, कवी, गायक, वादक ,अभिनयकार या कलाकारांनी या सभेसाठी उपस्थित राहून या धम्म चळवळीला योगदान द्यावे, मार्गदर्शन करावे असे आवाहन धम्मक्रांती कला मंच रत्नागिरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी  मालगुंड गावचे सुपुत्र रविकांत पवार ९४२१२२९३३६, करबुडे येथील आशुतोष जाधव,९३२६१६१८७६, रत्नागिरीतील नितीन मोहिते ९४२२१४४४६०,  नितीन मोहिते उमेश मोहिते ८७८८१८५०९०, सतीश कदम (निवेंडी) ९३७०९७३४८०,दीपक पवार (पोमेंडी) ९४०४३३५४४९ प्रशांत जाधव (सडामिऱ्या) ९६३७५८५८०५, मिलिंद कांबळे ९४२१२३१९४५ ,(विल्ये) संतोष पवार ९४२३०४९९८३ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

2475129
Share This Article