GRAMIN SEARCH BANNER

देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास रहाटे यांच्या रांगोळीची कर्नाटकवासीयांना भुरळ

Gramin Varta
102 Views

देवरुख : बेडकिहाळ, कर्नाटक येथे दसरा महोत्सवानिमित्त देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी फक्त २३ तासात १२ फुट बाय १७ फुट  आकारात साकारलेली छत्रपती संभाजी महाराज यांच्या “छावा” चित्रपटाच्या मुख्य पोस्टरची रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या भव्य रांगोळीसाठी विलास रहाटे यांनी २० किलो रांगोळीचा वापर केला आहे. कर्तव्य फाउंडेशनच्यावतीने कुसुमावती मिरगी महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात दसऱ्यापासून या रांगोळी प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. या रांगोळी प्रदर्शनास रांगोळी प्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभत असून, विलास रहाटे आकर्षक रांगोळीचे विशेष कौतुक होत आहे.

गेली ७ वर्ष बेडकीहाळ येथील दसरा महोत्सवासाठी  विलास रहाटे यांना सन्मानाने रांगोळी साकारण्यासाठी आमंत्रित केले जाते. प्रत्येक वर्षी गाजणाऱ्या एखाद्या चित्रपटाच्या प्रमुख पोस्टरची प्रदर्शनीय रांगोळी काढली जाते.  यावर्षी विलास रहाटे यांनी छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडात कैद करतानाचे दृश्य रांगोळीत साकारले आहे. विलास रहाटे महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत असल्यापासून या दसरा महोत्सवात भव्यदिव्य रांगोळी साकारत आहेत. यापूर्वी विलास यांनी  महाभारत, रामायण, पुष्पा, कांतारा, नरवीर तानाजी इत्यादी सिनेमा विषयक पोस्टरवर आधारित रांगोळ्या साकारून कर्नाटक राज्यात आपला नावलौकिक वाढवला आहे.

Total Visitor Counter

3371536
Share This Article